इतिहास हा जितका जमिनीच्या वर असतो त्यापेक्षा जास्त हा जमिनीच्या खाली गाडला गेलेला असतो.याचाच प्रत्यय मालवण तालुक्यातील आचरा टेंम्बली येथे घराचे खोदकाम करताना आला. याठिकाणी खोदकाम सुरू असताना चौकोनी आकाराचा दगडावर कोरलेले रेखीव शिल्प सापडले. दोन स्त्रिया हातात फुलं घेऊन शंकराच्या पिंडीजवळ हात जोडून बसल्याचे या शिल्पामध्ये दिसत आहे.ठेकेदाराने कुतूहलापोटी तो कामगारांच्या मदतीने दगड बाजूला काढून घेत साफ केला असता त्यावर कोरीव काम केल्याचे दिसून आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews